Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा पोर्टफोलिओ बनवा 'पॉवरफुल'! सिमेंट, ऊर्जा आणि विमा क्षेत्रातील हे शेअर्स देणार बंपर परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:00 IST

Top 5 Stocks to Buy : तुम्ही नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा करणार असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने ५ सर्वोत्तम शेअर्स निवडले आहेत.

Top 5 Stocks to Buy :शेअर बाजारात सध्या चढ-उताराचे वातावरण असले, तरी काही कंपन्यांच्या व्यवसायातील धोरणात्मक बदल आणि मजबूत आर्थिक कामगिरीमुळे त्या गुंतवणुकीसाठी सज्ज असल्याचे दिसत आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने आपल्या ताज्या रिसर्च रिपोर्टमध्ये लेमन ट्री हॉटेल्स, जेएसडब्ल्यू एनर्जी आणि अल्ट्राटेक सिमेंटसह ५ दर्जेदार शेअर्सवर 'बाय' रेटिंग देत मोठी लक्ष किंमत जाहीर केली आहे.

१. लेमन ट्री हॉटेल्स - लक्ष किंमत : २०० रुपयेलेमन ट्री आता आपल्या व्यवसायाची दोन भागात विभागणी करत आहे. हॉटेल व्यवस्थापन आणि हॉटेल फ्लेअर. या बदलामुळे कंपनीची पारदर्शकता वाढेल. वारबर्ग पिनकससारख्या मोठ्या संस्थेची साथ लाभल्यामुळे कंपनीची ताळेबंद मजबूत झाली आहे. २०२५ ते २०२८ दरम्यान कंपनीच्या नफ्यात २६% चक्रवाढ वाढ अपेक्षित आहे.

२. मॅक्स फायनान्शिअल - लक्ष किंमत : २,१०० रुपयेविमा क्षेत्रातील ही कंपनी उद्योगाच्या सरासरीपेक्षा जास्त वेगाने प्रगती करत आहे. जीएसटी सवलतीमुळे 'प्रोटेक्शन' आणि 'क्रेडिट लाईफ' विम्याला मोठी मागणी आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात १६% वाढ झाली असून सॉल्व्हन्सी रेशो २०८% वर पोहोचला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा एक सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

३. जेएसडब्ल्यू एनर्जी - लक्ष किंमत : ६५७ रुपयेस्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील ही कंपनी आपली क्षमता वेगाने विस्तारत आहे. कंपनीची क्षमता ७.२ गिगावॉटवरून १३.२ गिगावॉटवर पोहोचली असून २०३० पर्यंत ती ३० गिगावॉट करण्याचे उद्दिष्ट आहे. ग्रीन हायड्रोजन आणि फ्लोटिंग सोलर प्रकल्पांमधील गुंतवणूक कंपनीला भविष्यातील 'मल्टीबॅगर' बनवू शकते.

४. अल्ट्राटेक सिमेंट - लक्ष किंमत : १३,६५० रुपयेसिमेंट क्षेत्रातील या दिग्गज कंपनीचा बाजारातील वाटा ३२-३३ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. ग्रामीण भागातील सुधारणा आणि पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्चामुळे सिमेंटला मोठी मागणी आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात तब्बल ७५% वाढ झाली आहे. २०२८ पर्यंत कंपनीचे उत्पादन २०० दशलक्ष टनांचा टप्पा वेळेआधीच पार करेल, अशी चिन्हे आहेत.

५. झायडस वेलनेस - लक्ष किंमत : ५७५ रुपयेआरोग्य आणि पोषण क्षेत्रातील या कंपनीकडे शुगर फ्री, ग्लुकॉन-डी आणि एव्हरीयुथ यांसारखे दिग्गज ब्रँड्स आहेत. अलिकडच्या काळामध्ये 'RiteBite' सारख्या ब्रँड्सच्या संपादनामुळे कंपनीने आपला पोर्टफोलिओ मजबूत केला आहे. इतर एफएमसीजी कंपन्यांच्या तुलनेत हा शेअर सध्या ३०-३५% स्वस्त मिळत असल्याने गुंतवणूकदारांसाठी ही एक 'व्हॅल्यू बाय' संधी आहे.

एका नजरेत गुंतवणुकीचा तक्ता

कंपनीचे नावसध्याचे क्षेत्र लक्ष किंमतकालावधी
लेमन ट्री हॉटेल २०० १२-१८ महिने
मॅक्स फायनान्शिअलविमा२,१००१२-१८ महिने
जेएसडब्ल्यू एनर्जीऊर्जा ६५७ १२-१८ महिने 
अल्ट्राटेक सिमेंट सिमेंट १३,६५० १२-१८ महिने 
झायडस वेलनेस एफएमसीजी ५७५ १२-१८ महिने

वाचा - कोट्यवधींच्या रॉल्स रॉयसच्या दरात मोठी सवलत? किमतीत ४० टक्क्यांपर्यंत घटीची शक्यता

डिस्क्लेमर : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या अधिकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Build a Powerful Portfolio: Cement, Energy, and Insurance Stocks Offer Returns

Web Summary : Motilal Oswal recommends buying Lemon Tree Hotels, JSW Energy, UltraTech Cement, Max Financial, and Zydus Wellness. These companies show strong financial performance and strategic business changes, promising significant returns for investors in the current market.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकव्यवसाय